Local crime branch : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात कॉपर वायरचे दुकान फोडून चोरी (Theft) करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local crime branch) पथकाने पर्दाफार्ष केला आहे. या टोळीकडून तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या टोळीने विविध ठिकाणी ८ गुन्हे केले असल्याचे पोलीस (Police) तपासत समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीला सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे.
अवश्य वाचा: अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार मदत : पंकजा मुंडे
रेकॉर्डवरील सराईत आरोपी
महादेव रंगनाथ पवार (वय ४८,रा २१ चारी माळीनगर अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर), दादा लाला काळे (वय १९, रा. सवतगाव ता. माळशिरस, जि. सोलापूर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे साथीदार रामा लंग्या काळे (रा. तुळजापूर नका, पारधी पेढी ता. जि. धाराशीव), महादेव बाबू काळे (रा. पारधी पेढी ता. जि. धाराशीव), दिलीप मोहन पवार (वय २१, रा. चारी माळी नगर ता. माळशिरस जि. सोलापूर), सुरेश नामु काळे (रा. सवतगाव ता. माळशिरस जि.सोलापूर), सुरेश नामदेव चव्हाण (सर्व पसार, (रा. सवतगाव, जि.सोलापूर), यांनी मिळून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यातील महादेव रंगनाथ पवार हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून त्याच्याविरुद्ध सोलापूर, धाराशिव, सातारा, रायगड व पुणे जिल्ह्यामध्ये दरोड, घरफोडी व चोरीचे एकूण १३ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नक्की वाचा : असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत 30 सप्टेंबरला नगर येथे बैठक
शटर उचकटुन कॉपर वायरची चोरी (Local crime branch)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील राशीन परिसरातील राशिन ते काळेवाडी जाणारे रस्त्यालत असलेले शिवम मशिनरी ऍ़ण्ड स्टुल्स दुकानाचे शटर उचकटुन दुकानातील ६४ हजार रुपये किमतीचे कॉपर वायर चोरुन नेणारा महादेव पवार व त्याच्या टोळीने गुन्हा केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला सोलापूर येथून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, आकाश काळे, बाळासाहेब खेडकर, महादेव भांड, अरुण मोरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांच्या पथकाने केली.