Local Crime Branch : श्रीरामपुरमध्ये नशेची इंजेक्शन विक्री करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

Local Crime Branch : श्रीरामपुरमध्ये नशेची इंजेक्शन विक्री करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

0

Local Crime Branch : नगर : श्रीरामपूर शहरात नशेची इंजेक्शनची (Drug Injection) विक्री करणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल ३१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पंकज राजकुमार चव्हाण (वय-२१, रा. खंडाळा ता. श्रीरामपूर), असे ताब्यात घेतलेलया संशयित आरोपीचे (Suspected Accused) नाव आहे.

अवश्य वाचा : परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मेडिकलमध्ये अवैध नशेच्या इंजेक्शनांची विक्री

याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात नशेचे इंजेक्शन, अंमली पदार्थ विकणाऱ्यांविरोधी विशेष मोहीम राबविणेबाबत आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत एका मेडिकलमध्ये अवैध नशेच्या इंजेक्शनांची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित आरोपी पंकज राजकुमार चव्हाण यास ताब्यात घेतले.

नक्की वाचा : “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार

यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)

मेडीकल व घराची झडती घेतली असता ३१ हजार ३७० रुपये किमतीचा नशेकरीता वापरल्या जाणा-या बाटल्या व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार, विजय पवार, राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड, सुनील मालणकर, रमीझराज आत्तार, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.