Local Crime Branch : अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा गुजरात मधून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा गुजरात मधून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा गुजरात मधून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा गुजरात मधून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण (Minor Girl Kidnapped) करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने गुजरात (Gujarat) येथून ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी पीडित मुलीला बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अवश्य वाचा : आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला, डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ

ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव

निलेश अशोक सावंत (वय २९, रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची फिर्याद बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा निलेश सावंत याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

नक्की वाचा : दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास

यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)

त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित आरोपीला गुजरात येथून ताब्यात घेतले. आरोपीला व पीडितेला पुढील तपासाठी बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड़, सोमनाथ झांबरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांच्या पथकाने केली आहे.