Local Crime Branch : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा; ३२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Local Crime Branch : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा; ३२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

0

Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर शहराजवळ असलेल्या नेप्ती नाका परिसरात अवैध सुरु असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर (Gas Refilling Center) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून या ३२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील

पथकाने सापळा रचून टाकला छापा

सतीश आनंद टेकाळे (वय-३२,रा. नालेगाव, अहिल्यानगर ता. जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार नेप्ती नाका परिसरात वाहनांमध्ये अवैध गॅस रिफिलिंग होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला.

अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?

९ गॅस टाक्या हस्तगत (Local Crime Branch)

त्याच्याकडून गॅस रिफिलिंग साहित्य, घरगुती वापराच्या ९ गॅस टाक्या असा एकूण ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे व पोलीस अंमलदार सुनील पवार, गणेश लबडे, बाळासाहेब नागरगोजे, रमिजराजा आत्तार, अमृत आढाव यांच्या पथकाने केली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.