
Local Crime Branch : नगर : नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) परिसरात गावठी कट्टा (Gavathi Katta) विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे असा एकूण ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज मागे
खात्रीशीर माहिती नुसार छापा
भारत सोपान कापसे (वय २७, रा. मराठी शाळेजवळ, कांगोणी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार नेवासा तालुक्यातील कांगोणी परिसरात गावठी कट्टा विक्री करण्यासाठी भारत कापसे हा येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून आरोपी ताब्यात घेतले.
नक्की वाचा : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
६४ हजाराचा मुद्देमाल घेतला ताब्यात (Local Crime Branch)
त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे असा एकूण ६४ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याबाबत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमिझराजा अत्तार, प्रशांत राठोड, महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे.


