Local Crime Branch : नगर : करंजी (Karanji Ghat) घाटात वाहने अडवून लूटमार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून या सात लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज मागे
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
संकेत चिंधू पडवळ (वय-२५), नामदेव बाळासाहेब भोकसे (वय -२८, दोघे रा. कुरकुंडी ता. खेड जि. पुणे), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. संशयित आरोपींने जगदीश सुरेश शिवेकर (रा.करंजविहिरे ता. खेड जि.पुणे), यांच्या सोबत गुन्हा केला असल्याचे पोलीस तपासात समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात वाहणे अडवून लूटमार पडवळ याने त्याच्या साथीदाराने केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
नक्की वाचा : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)
त्यानुसार पथकाने कडुस फाटा, खेड, जि. पुणे या ठिकाणावरून सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून सात लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयित आरोपींना पुढील तपासाकामी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, सुरेश माळी, दीपक घाटकर, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा आतार, मनोज साखेर, भगवान धुळे यांच्या पथकाने केली.



