Local Crime Branch : किराणा दुकान पेटविणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

Local Crime Branch : किराणा दुकान पेटविणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

0
Local Crime Branch : किराणा दुकान पेटविणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 
Local Crime Branch : किराणा दुकान पेटविणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

Local Crime Branch : नगर : शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील किराणा दुकान पेट्रोलच्या साहाय्याने पेटविणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी (ता. १९) रोजी घडली होती. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात (Shevgaon Police Station) अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला होता.

नक्की वाचा : “पंकजा मुंडेंना गृहमंत्री तर सुषमा अंधारेंकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या”

याने गुन्हा केल्याचे तपासात आले समोर

निलेश शिवाजी नेहुल (वय-२६, रा. आव्हाने बु, शेवगाव जि. अहिल्यानगर), गौरव सॅमसन उजागरे (वय -२४, रा. पिराजवळ, उजागरे मळा, बुरुडगाव, ता. जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार अभिषेक बाळासाहेब साळवे (रा. झोपडपट्टी, बुरुडगाव ता. जि. अहिल्यानगर), याने हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले.

अवश्य वाचा: सफाई काम करणाऱ्या महिलेची मुलगी झाली क्लास वन अधिकारी

सापळा रचून तपोवन परिसरातून घेतले ताब्यात (Local Crime Branch)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार १९ ऑक्टोबर रोजी रात्री काही अज्ञात व्यक्तीने शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील साई गणेश किरणा दुकानाला पेट्रोल च्या साहाय्याने आग लावून दुकानाचे नुकसान केल्याची फिर्याद शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या घटनेचा समांतर तपास करत असता हा गुन्हा निलेश शिवाजी नेहुल याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तपोवन परिसरातून ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, रिचर्ड गायकवाड, बाळासाहेब नागरगोजे, जालिंदर माने, किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव, सोनल भागवत, चालक चंद्रकांत कुसळकर, तसेच शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर व पोलीस अंमलदार नकुल फलके, दादासाहेब खेडकर यांच्या पथकाने केली.