Local Crime Branch : अवैध वाळू वाहतूक करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : अवैध वाळू वाहतूक करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : अवैध वाळू वाहतूक करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : अवैध वाळू वाहतूक करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : जामखेड तालुक्यात अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transportation) करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

जामखेडमधील अरणगाव ते फक्राबाद परिसरात कारवाई

रवींद्र बाळासाहेब पवार (वय ३२,रा. अरणगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), शहाजी अशोक जेवे (रा. खडकत ता. आष्टी, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील अरणगाव ते फक्राबाद परिसरात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, शामसुंदर जाधव यांचे पथकाने केली.