Local Crime Branch : नगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पोलिसांनी रविवारी सकाळी अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरामध्ये सुरू असलेल्या दोन कत्तलखान्यांवर (Illegal Slaughterhouses) छापेमारी केली. एकुण १२ जणांविरूध्द कोतवाली पोलीस (Police) ठाण्यात दोन गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून जिवंत जनावरे, गोमांस, वजन काटा, सूरा व मोबाईल असा एकुण २४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
नक्की वाचा : कधी होणार यंदाचा महा कुंभमेळा? वाचा सविस्तर…
नऊ लाख नऊ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधीक्षक राकेश ओला व गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी सकाळी आठच्या सुमारास झेंडीगेट परिसरामध्ये अरबाज गुल्लू कुरेशी (रा. झेंडीगेट) याच्या घराच्या पाठीमागील बाजूस सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला. तेथे इरफान एजाज कुरेशी (वय ३८, रा. झेंडीगेट) व रफिकउल जुनाब परामल (वय २८, रा. बाबा बंगाली, झेंडीगेट) हे दोघे मिळून आले. त्यांच्या ताब्यातून तीन हजार २० किलो गोमांस, इलेक्ट्रीक काटा, लोखंडी सुरा असा एकुण नऊ लाख नऊ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अरबाज गुल्लु कुरेशी व निहाल इस्माईल कुरेशी (रा. झेंडीगेट) यांच्या सांगण्यावरून जनावरांची कत्तल करत असल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अवश्य वाचा : मुकुंदनगर खून प्रकरणातील आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात
१५ लाख ४८ हजाराचा मुद्देमाल ताब्यात (Local Crime Branch)
तसेच पथकाने 22 नंबर मस्जीद समोर, व्यापारी मोहल्ला येथे छापा टाकला असता आठ जण गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आले. यामध्ये तौसीफ सादीक कुरेशी (वय ३४), इरफान फारूक कुरेशी (वय ३८), समत बाबुलाल कुरेशी (वय ४७), शफिक नूर कुरेशी (वय ६०), फिरोज फारूक कुरेशी (वय ३२), अरकान अशिफ कुरेशी (वय २१), सादिक गुलामनबी कुरेशी (वय ४०), शहारिक रशीद कुरेशी (वय ३० सर्व रा. झेंडीगेट, अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून जनावरे, गोमांस, वजन काटा, लोखंडी सुरा व पाच मोबाईल असा १५ लाख ४८ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. आठ जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.