Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील पवनचक्कीच्या (Windmill) कॉपर केबलची चोरी (Theft) करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून तब्बल पाच लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
अतुल विश्वनाथ शिंदे (वय ३५, रा. शहाजापूर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), संकेत बाळासाहेब म्हस्के (वय २२, रा. पिंपळगाव कौडा), अनिकेत शशिकांत गवळी (वय ३०, रा. शहाजापूर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा ऋषीकेश सुनील पवार (रा. पिंपळगाव कौडा, ता. जि. अहिल्यानगर), अरुण शिवाजी गवळी (रा. शहांजापूर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), पप्पू बाबाजी जाधव (रा. सदर), प्रवीण सावकार म्हस्के, श्रीकांत संपत साठे (रा.हंगा, ता. पारनेर, जि अहिल्यानगर), स्वप्नील पवार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), अक्षय सकट (सर्व पसार) यांनी केला असल्याचे पोलीस तपासत समोर आले आहे. आरोपींकडून चोरी केलेला तब्बल पाच लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला
ताब्यात घेतलेले आरोपी सराईत गुन्हेगार (Local Crime Branch)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार पवनचक्कीची कॉपर वायर चोरी करणारी टोळी ही पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, फुरकान शेख, अतुल लोटके, गणेश लबडे, रिचर्ड गायकवाड, भिमराज खर्से, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, अरुण मोरे तसेच सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मेघराज कोल्हे, योगेश सातपुते यांच्या पथकाने केली.



