Local Crime Branch : नगर : पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transport) करणाऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा
ताब्यात घेतलेला संशयित आरोपी
सुनील बबन केदार (वय-३०, रा. खडकवाडी ता. पारनेर जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीची ४ ब्रास वाळू व १५ लाख रुपये किमतीची डंपर असा एकूण १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल
यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)
याबाबत पोलीस योगेश जबाजी कर्डिले यांच्या फिर्यादीवरुन पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार टाकळी ढोकेश्वर ते खडकवाडी परिसरातून अवैध वाळू वाहतूक होत असलयाची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार संतोष खैरे, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, योगेश कर्डिले चालक अरुण मोरे यांच्या पथकाने केली.



