
Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर शहरातील सराफ व्यापाऱ्याचे दागिने पळविणारी टोळी (Jewelry Thief Gang) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पश्चिम बंगाल (West Bengal) येथून ताब्यात घेतली आहे. त्याच्याकडून ५७२.७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ५१ लाख १३ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने केली.
अवश्य वाचा : काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा, तर अनेकांना अद्याप प्रतीक्षा
१ कोटीचे दागिने घेऊन झाले हाेते पसार
कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या कृष्णा जगदीश देडगावकर (वय- ३२), यांचे अहिल्यानगर येथे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे दुकानामध्ये काम करत असलेले दिपनकर माजी, सोमीन बेरा, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तु बेग, स्नेहा बेरा यांनी फिर्यादीचे विश्वास संपादन करुन सोनार दुकानातुन १ कोटी १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन पसार झाली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास करत असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील संशयित आरोपी हे अमरागरी (जि. हावरा, पश्चिम बंगाल) येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सोमेन शांती बेरा उर्फ कार्तीक वय – 33 रा. पलाशपाई, थाना-खानाकुल हुगली राज्य पश्चिम बंगाल), दिपनकर आरुण माजी (वय -२२), अनिमेश मनोरंजन दोलुई (वय- २५), सोमनाथ जगन्नाथ सामंता (वय- ३०,रा. सबलसिंगपुर ), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा संतू बेरा, स्नेहा बेरा यांचेसोबत केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
नक्की वाचा : काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचणीला सुरुवात; मुलाखतीसाठी अर्ज मागविले
५१ लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत (Local Crime Branch)
त्यांच्याकडून ५१ लाख १३ हजार ७९५ रुपये किमतीचे ५७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, दीपक घाटकर, भिमराज खर्से, राहुल डोके, सतीश भवर, प्रशांत राठोड यांच्या पथकाने केला आहे.


