
Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर शहारात घरगुती गॅस सिलेंडरची (Domestic Gas Cylinder) विनापरवाना विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून १० लाख ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता; वनमंत्री गणेश नाईक
१० लाख ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
उमेश बाळासाहेब चांदगुडे (वय -३७, रा.सुपा ता.बारामती, जि. पुणे), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख ८५ हजार रुपयांच्या ११० भरलेल्या व रिकाम्या गॅस टाक्या व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण १० लाख ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : संगमनेर नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा खताळ विरुद्ध डॉ. मैथिली तांबे ‘दुरंगी’ लढत रंगणार
कल्याण रोड चौफुला येथे सापळा रचून कारवाई (Local Crime Branch)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार विनापरवाना घरगुती गॅसची विक्री करण्यासाठी एमआयडीसी ते केडगाव बायपास या रस्त्याने वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कल्याण रोड चौफुला येथे सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार सुनील पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख, अर्जुन बडे यांच्या पथकाने केली.


