Local Crime Branch : नगर : स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) जामखेड शहरात धारदार शस्त्रे बाळगणारा एक व्यक्ती ताब्यात घेतला आहे. कैयब शकील पठाण (वय १८,रा. मिलींदनगर, जामखेड, ता. जामखेड) असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे (Suspected Accused) नाव आहे. त्याच्या ताब्यातून दोन लोखंडी कोयते, एक कु-हाड, एक सुरा, एक चाकू असा एकूण ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा
अनेक हत्यारे जप्त
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार जामखेड ते बीड जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीहून अवैध धारदार शास्त्र घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीनुसार जामखेड शहरातील एका हॉटेल समोर सापळा रचून दुचाकी ताब्यात घेतली. त्याच्याकडून दोन लोखंडी कोयते, एक कु-हाड, एक सुरा, एक चाकू असा एकूण ३२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार
यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)
याबाबत पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, लक्ष्मण खोकले, शाहिद शेख, गणेश धोत्रे, दीपक घाटकर, शामसुंदर जाधव, बाळासाहेब नागरगोजे यांच्या पथकाने केली.



