Local Crime Branch : सराफ दुकानात चोरी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : सराफ दुकानात चोरी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : सराफ दुकानात चोरी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : सराफ दुकानात चोरी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : राहाता तालुक्यातील लोणी येथील सराफ दुकानात पिस्तुलाचा धाक दाखवत चोरी करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने १२ तासात जेरबंद केली. त्यांना श्रीगोंदा-बेलवंडी परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५५ हजारांची मोबाईल, गावठी कट्टा (Gavthi Katta) दोन जिवंत काडतुसे असा एकूण ७ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार

संशयित आरोपींची नावे

बबन भाऊसाहेब घावटे (वय-३३, रा. राजापूर ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), कृष्णा पोपट गायकवाड (वय-३५,रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नक्की वाचा : काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर गुन्हा दाखल; महाराजांचा अवमान केल्याचा आरोप

संकेत जाधव, करण खरात यांनी गुन्हा केल्याचे समोर (Local Crime Branch)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार राहाता तालुक्यातील लोणी परिसरात सराफ दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटणारा बबन घावटे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्याने हा गुन्हा त्याच्या साथीदारासह केला असून ते चारचाकी घेऊन ते श्रीगोंदा-बेलवंडी रस्त्यावर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता संकेत जाधव (रा. गोलेगाव ता.शिरुर, जि.पुणे), करण खरात (रा. हिंगणी ता. श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) यांनी केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहे.

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी बबन घावटे त्याचेविरुध्द अहिल्यानगर, व पुणे जिल्ह्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, दरोडा, जबरी चोरी असे एकूण १५ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, दीपक घाटकर, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, श्याम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, रमीझराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, प्रशांत राठोड, मनोज साखरे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक महादेव भांड, अर्जुन बडे यांच्या पथकाने केली.