Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर शहरातील तपोवन परिसरात रात्रीचे मेडिकल फोडणारे (Burglary) दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद (Arrested) केले आहे. त्यांच्याकडून ५३ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : शिक्षिका धर्मांतराबाबतचे धडे देत असल्याचा आरोप; पोलीस अधीक्षकांना निवेदन
दोघे संशयित आरोपी सराईत गुन्हेगार
आर्यन पप्पू शेख (वय -१९), अकबर लुकमान खान (वय.३३,दोघे रा. दौला वडगाव (ता. आष्टी, जि. बीड), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ताब्यात घेतलेले दोघे संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध चोरी, घरफोडी असे भिंगार कॅम्प तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात सात ते आठ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अवश्य वाचा : महापालिकेच्या मतदार यादीत श्रीगोंद्याची चार हजार नावे; अभिषेक कळमकरांचे आयुक्तांना निवेदन
सापळा रचून आरोपीस घेतले ताब्यात (Local Crime Branch)
काही दिवसापूर्वी सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावर असलेले मेडिलक फोडून त्यातील रोक रक्कम अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार ही चोरी अकबर खान याने त्याच्या साथीदारांसह केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तसेच हे संशयित आरोपी चोरीचा मुद्देमाल विक्री करण्यासाठी अहिल्यानगर येथे येत असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुनील पवार, शाहीद शेख, फुरकान शेख, गणेश धोत्रे, दीपक घाटकर, राहुल डोके, भिमराज खर्से, सतीश भवर, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत, चालक भगवान धुळे यांच्या पथकाने केली.



