Local Crime Branch : नगर : नोंदणीकृत अॅक्टिव्ह सोशल क्लबमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) व राहाता पोलिसांच्या (Police) संयुक्त पथकाने कारवाई करत १८ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ लाख १६ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई (Action) राहाता तालुक्यातील साकुरी येथे करण्यात आली.
नक्की वाचा : जूनपासून देशातील शिक्षण पद्धतीत ‘हे’ होणार बदल
राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Local Crime Branch)
गणेश विठ्ठल जेजुरकर (वय ३५, रा.राहाता), कैलास अशोक मंजुळ (वय २९, रा.कोपरगाव), इक्बाल सैफु शेख (वय ३५, रा.शिर्डी), अक्षय आप्पासाहेब खोतकर(वय २६, रा.खंडोबा गल्ली, राहाता), सचिन मधुकर बारे (वय ३५, रा.विजयनगर, सिन्नर), ज्ञानदेव नामदेव गव्हाणे (वय ४२, रा.आडगाव, ता.राहाता), विजय अगस्तीन वाघमारे (वय ५०, रा.पिंपळस, ता.राहाता), भाऊसाहेब रामराव चौधरी (वय ३५, रा.रूई, ता.राहाता), संदीप सुधाकर अभंग (वय २८, रा.पळाशी, जि.नाशिक), सचिन योसेफ बनसोडे (वय २६, ता.साकुरी, ता.राहाता), महेश हरी लोखंडे (वय २३, रा.पिंपळस, ता.राहाता), अनिस नसीर शेख (वय ५०, रा.कोल्हार, ता. राहाता), वसंत लक्ष्मण वडे (वय ६४, रा.येवला, ता.येवला), समीर रफिक पटेल (वय २२, रा.कोल्हार, ता.राहाता), मनोज लक्ष्मण मोरे (वय ४८, रा.साकुरी, ता.राहाता), सोमनाथ लक्ष्मण भगत (वय ४४, रा.घोटी, ता.इगतपुरी), उत्तम रामराव कोळगे (वय ५८, रा.नांदुर्खी, ता.राहाता), हमराज सर्फराज कादरी (वय ५५, रा.शिर्डी, ता.राहाता) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.