Local Crime Branch : नगर : चक्क टँकरमधूनच घरगुती गॅस टाक्यामध्ये अवैध गॅस रिफिलिंग (Illegal Gas Refilling) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने केडगाव परिसरातून एक टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून गॅस टँकर तसेच घरगुती गॅस टाक्या (Domestic LPG Cylinder) असा एकूण ४१ लाख २६ हजार ३३९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या; खासदार नीलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
संशयित आरोपींची नावे
कृष्णा मधुकर दहिफळे (वय-३०, रा. कोळवाडी, किनगाव, ता. अहमदपूर, जि. लातुर), अदित्य सुनिल पवार (वय. २१, रा. बीबी ता.लोणार जि. बुलढाणा, हल्ली रा. निल हॉटेल केडगाव अहिल्यानगर), विश्वास त्रिंबक शिंदे (वय -५१, रा. केडगाव, अहिल्यानगर), जनातुल शेख (वय- १९, रा. चापरा, बांगलजी, ता.नदिया, जि.नदिया, वेस्ट बंगाल, हल्ली रा.निल हॉटेल, केडगाव अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मालक राजू साबळे रा. केडगाव अहिल्यानगर (पसार) हा असल्याचे समोर आले आहे.
अवश्य वाचा: जिल्हा प्रशासन व महापालिका सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली; अभिषेक कळमकर यांचा आरोप
४१ लाख २६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार केडगाव बायपास परिसरात चक्क टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंग होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला. त्यांच्याकडून ८ लाख ३६ हजार ३३९ रुपये किंमतीच्या गॅस १७ टन गॅस, ३० लाख रुपये किमतीचा टॅकर, ६० हजार रुपये किमतीच्या २० रिकाम्या गॅस टाक्या, २२ हजारा ५०० रुपये किमतीच्या ५ भरलेल्या गॅस टाक्या, दोन लाख रुपये किमतीचा एक टेम्पो, ५ हजार ५०० रुपयांचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, दोन हजार रुपयांचा गॅस भरण्यासाठी वापले जाणारे पाईप असा एकूण ४१ लाख २६ हजार ३३९ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, अनंत सालुगडे, पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, दीपक घाटकर, बिरप्पा करमल, राहुल द्वारके, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सतीश भवर, योगेश कर्डिले, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, चालक अर्जुन बडे, भगवान धुळे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



