Local Crime Branch : नगर : एमआयडीसी (MIDC) परिसरात गावठी कट्टा बाळगणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा (Gavathi Katta), एक जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन
गावठी कट्टा असल्याची खात्रीशीर माहिती
दीपक भाऊसाहेब साळवे (वय. ३१, रा. शिंगवे नाईक, ता. जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका टपरीच्या आडवशाला एका संशयिताकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. याबाबत दीपक भास्कर घाटकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी: खासदार भाऊसाहेब वाकचौरे
यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अमंलदार ह्रदय घोडके, दीपक घाटकर, बिरप्पा करमल, भिमराज खर्से, राहुल डोके, योगेश कर्डिले, सतीश भवर, चालक उमाकांत गावडे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.



