Local Crime Branch : कोपरगाव तालुक्यातून अडीच लाखांचा अवैध गुटखा हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : कोपरगाव तालुक्यातून अडीच लाखांचा अवैध गुटखा हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0

Local Crime Branch : नगर: जिल्ह्यात बंदी असलेल्या अवैध गुटख्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून अडीच लाखांचा अवैध गुटखा(Illegal Gutkha) हस्तगत केला आहे. याबाबत तीन संशयीतांना कोपरगाव तालुक्यातून ताब्यात घेतली असून कोपरगाव पोलीस ठाण्यात (Kopargaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे

प्रमोद सजन बोथरा (वय -२९ रा. शरदानगर, कोपरगाव), योगेश विजय कटाळे (वय – ३९ वर्षे रा. खडकी ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर), नामदेव संजय पगारे (वय- १९ रा. सुभाषनगर ता.कोपरगाव जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर मुस्ताक अब्बास सय्यद (रा.नांदगाव रोड पाण्याच्या टाकीजवळ येवला, जि.नाशिक)
हा आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अवश्य वाचा : रेल्वेमार्गासाठी आमदार किरण लहामटे यांचे अनोखे आंदोलन

दोन लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यात अवैध गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दी तसेच शहरात कारवाई करत दोन लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, सतीश भवर, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली आहे.