Local Crime Branch : नगर : जामखेड येथे एका हॉटेलवर राडा घालत गोळीबार (Firing) करून रोहित पवार (Rohit Pawar) यांना जखमी करणारे तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा (Country-Made Pistol) असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अवश्य वाचा: जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
वस्ताद विलास माने (वय ४९,रा. जामखेड), शुभम शहाराम लोखंडे (वय -२६, रा. ता. आष्टी, जि. बीड), बालाजी शिवाजी साप्ते (वय २७, रा. तेली गल्ली, पांढरे मेडिकलचे पाठीमागे, ता. आष्टी, जि. बीड), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. जामखेड तालुक्यातील एका हॉटेल मध्ये राडा घालत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी चालून एकाच जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करत असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी हे अहिल्यानगर तालुक्यातील एका हॉटेलमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
नक्की वाचा : जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही: मुख्यमंत्री
यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, शामसुंदर जाधव, बाळासाहेब गुंजाळ, मनोज साखरे, सागर ससाणे, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.



