Local Crime Branch : नगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात अवैध दारू विक्री (Illegal liquor sale) करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून तीन लाख १६ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात (Ghargaon Police Station) एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगरच्या ‘एसबीआय’च्या मुख्य शाखेत ३ कोटी ७७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव
शशांक नंदू निमसे (वय – २२, रा. संतवाडी, निमसेमळा, आळे, ता. जुन्नर, जि. पुणे), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार अकलापूर गावाच्या शिवारात अवैध दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध कंपनीची १६ हजार ४४५ रुपयांच्या दारुच्या बाटल्या तसेच दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन असे तीन लाख १६ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही : माजी मंत्री थोरात
घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Local Crime Branch)
याबाबत पोलीस अंमलदार बाळासाहेब अशोक गुंजाळ यांचा फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, भगवान थोरात, चालक भगवान धुळे यांच्या पथकाने केली आहे.



