Local Crime Branch : राहुरी तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : राहुरी तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : राहुरी तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : राहुरी तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : राहुरी तालुक्यात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने तीन ठिकाणी छापा टाकून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Crime registered) करण्यात आला आहे. त्यांच्याकडून जुगार (Gambling) खेळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण सात हजार १६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आज १४ उमेदवारी अर्ज दाखल

सापळा रचून आरोपीस घेतले ताब्यात

राधेशाम दत्तात्रय कुसमुडे (रा. राहुरी वेस, वांबोरी, ता. राहुरी), अमोल बाळू घोरपडे (रा. मुलनमाथा, बजरंग चौक, राहुरी), निलेश भाऊसाहेब गुंजाळ (रा. राहुरी (फरार), दाऊद दादामियाँ शेख (रा. मल्हारवाडी रोड, राहुरी), संतोष जगन्नाथ वाणी (रा. काळे आखाडा, मल्हारवाडी), असे गुन्हा दाखल झालेल्या स संशयित आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात अवैध जुगार खेळ खेळविला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

नक्की वाचा : बिडी कामगारांच्या घरांच्या जागांची परस्पर विक्री; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन

७ हजरांचा मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)

तसेच राहुरी शहर, मल्हारवाडी परिसरात छापा टाकून त्यांच्याकडून ७ हजरांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार भगवान थोरात, रमीजराजा आतार, विशाल तनपुरे यांच्या पथकाने केली.