Local Crime Branch : नगर : कंदुरीच्या कार्यक्रमात किरकोळ वादातून गोळी घालून खून (Murder) करणाऱ्या संशयित आरोपीला बाभळेश्वर (ता. राहाता) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. नेवासा तालुक्यातील चांदा येथे कंदुरीच्या कार्यक्रमात किरकोळ कारणातून शाहिद राजमहंमद शेख यांचा गावठी कट्ट्यातून गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) खुनाचा गुन्हा दाखल आहे.
अवश्य वाचा : संक्रांत साजरी करता, मात्र आदला आणि नंतरचा दिवस का महत्वाचा आहे ? जाणून घ्या…
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव
सुरज लतीफ शेख (वय २४, रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अक्षय बाळू जाधव (रा. समतानगर चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), सुरज कैलास उबाळे (रा. शास्त्रीनगर, चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) (दोघे पसार) यांनी खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नक्की वाचा: निंबळकमधील दुकानातून १५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार चांदा येथे खून करून पसारा झालेला संशयित आरोपी सूरज शेख हा राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदार अतुल लोटके, विजय पवार, गणेश लोंढे, फुरकान शेख, दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, उमाकांत गावडे, अरुण मोरे महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे यांच्या पथकाने केली आहे.



