Local Crime Branch : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २१ गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

Local Crime Branch : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २१ गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

0

Local Crime Branch : नगर : राहाता तालुक्यातील ममदापूर येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २१ गोवंशीय जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने केली. याबाबत सहा जणांविरुद्ध लोणी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ९ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

नक्की वाचा : मोठी बातमी!दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे

साजिद युनूस कुरेशी (वय २६, रा.ममदापूर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर), रेहान अहमद अयाज कुरेशी वय २४, रा.ममदापूर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर शोएब यासीन कुरेशी, शाहिद उस्मान कुरेशी, मुद्दसर गुलाम कुरेशी (दोघे रा.ममदापूर, ता.राहाता), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

अवश्य वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्रोची एन्ट्री; पाकिस्तानच्या हालचालीवर इस्रोच्या १० उपग्रहांची नजर

सापळा रचून जनावरांची सुटका (Local Crime Branch)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार ममदापूर परिसरात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून जनावरांची सुटका केली. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोसई अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश भिंगारदिवे, गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, अमोल कोतकर, मनोज लातुरकर, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, सुनिल मालणकर, भाऊसाहेब काळे, अमृत आढाव, विशाल तनपुरे, प्रमोद जाधव, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार, शिवाजी ढाकणे व उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली.