Local Crime Branch : तारकपूर येथील विराज कॉलनीत घरफोडी करणारा जेरबंद; १९ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Local Crime Branch : तारकपूर येथील विराज कॉलनीत घरफोडी करणारा जेरबंद; १९ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
Local Crime Branch : तारकपूर येथील विराज कॉलनीत घरफोडी करणारा जेरबंद; १९ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Local Crime Branch : तारकपूर येथील विराज कॉलनीत घरफोडी करणारा जेरबंद; १९ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर शहरातील तारकपूर परिसरात असलेल्या विराज कॉलनीत घरफोडी (Burglary) करणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून तब्बल १९ लाख ४२ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी सराईत गुन्हेगार (Hardened criminal) असून त्याच्या विरुद्ध तब्बल ३८ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस (Police) तपासात समोर आले आहे. रमेश महादेव कुंभार (वय ४९ रा. अमाप रेसीडेन्सी, कशेळी, ठाणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता आशिष शिंदे (रा. बारामती ता.बारामती जि. पुणे) (फरार) यांनी मिळून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

अवश्य वाचा : अहिल्यानगर मनपा निवडणूक : महायुतीचा ‘महाविजय’, तर दिग्गजांना पराभवाचा धक्का!

सापळा रचून आरोपी ताब्यात

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडून १९ लाख ४२ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी अशोक कुमार विजय कुमार अग्रवाल यांच्या राहात्या घरी अज्ञात चोरटयांनी दरवाजाचे लॉक तोडुन आत प्रवेश करुन घरामध्ये ठेवलेले १४ लाख ७५ हजारांचे सोने, डायमंड, चांदी व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली होती. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास करत असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा रमेश कुंभार याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ठाणे येथून ताब्यात घेतले.

हे देखील वाचा: महायुतीत लहान-मोठा भाऊ कोण? गुगली प्रश्नावर विखेंचं उत्तर

आरोपीवर तब्बल ३८ गुन्हे दाखल (Local Crime Branch)

संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात तब्बल ३८ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार, रवींद्र पांडे, सुरेश माळी, गणेश धोत्रे, शाहिद शेख, फुरकान शेख, दीपक घाटकर, बिरप्पा करमल, सतीश भवर, रोहित येमुल, अमृत आढाव, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, चालक भगवान धुळे यांच्या पथकाने केली.