Local Crime Branch : जामखेड तालुक्यातून साडेतीन लाखांचा गांजा हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : जामखेड तालुक्यातून साडेतीन लाखांचा गांजा हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : जामखेड तालुक्यातून साडेतीन लाखांचा गांजा हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : जामखेड तालुक्यातून साडेतीन लाखांचा गांजा हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर: जामखेड तालुक्यातील तरडगाव फाटा परिसरात अवैध गांजाची (Marijuana) वाहतूक करत असल्येल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज (ता. २९) जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल तीन लाख ४६ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत खर्डा पोलीस ठाण्यात (Kharda Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?

तीन लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सचिन नवनाथ गायकवाड (वय-२५, रा. पिंपरखेड, ता.जामखेड, जि. अहिल्यानगर), सुक्षय उर्फ सोमा सुनील काळे, वय-२३, रा. खर्डा, ता.जामखेड),असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सुभम घुंगरे (रा.माहिजळगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर) (पसार) यांचेकडुन विक्रीकरीता आणलेला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून ९.८५४ कि.ग्रॅम अंमली पदार्थचा गांजा दोन लाख ४५, हजार ४७५, व ३० हजार रुपया किमतीचे दोन फोन, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण तीन लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार खर्डा पोलीस ठाणे हद्दीत तरडगाव परिसरात अवैध गांजाची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, समीर अभंग पोलीस अंमलदार, ह्रदय घोडके, संतोष खैरे, गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, चालक महादेव भांड, व खर्डा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत, पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, शेषराव म्हस्के, बाळू खाडे, धनराज बिराजदार, शकिल बेग यांच्या पथकाने केली.