Local Crime Branch : सोनईत गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : सोनईत गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : सोनईत गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : सोनईत गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : नेवासा (Newasa) तालुक्यातील सोनई येथील श्रीरामवाडी परिसरात अवैध गावठी कट्टा (Gavathi Katta) बाळगणाऱ्या संशयित आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाई केली आहे. कयाच्याकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. अमोल रावसाहेब विटनोर (वय २७, रा. मांजरी, ता. राहुरी) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

अवश्य वाचा : संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात

किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर सोनई-खेडले परमानंद रस्त्यावर सापळा रचण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त (Local Crime Branch)

या वेळी अमोल रावसाहेब विटनोर (वय २७, रा. मांजरी, ता. राहुरी) हा संशयितरित्या आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेला आरोपीवर यापूर्वीही आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासा समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल बागवत चालक उमाकांत गावडे, महादेव भांड तसेच सायबर पोलीस ठाण्याचे दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर यांच्या पथकाने केली आहे.