Local crime branch : नगर : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात घरफोडी (Burglary) करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local crime branch) पथकाने धुळे येथून ताब्यात घेतली आहे. या टोळीने चार घरफोड्या केल्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्यांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या (Bhingar camp police) ताब्यात देण्यात आले आहे.
नक्की वाचा : आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…
संशयित आरोपींची नावे
कैलास चिंतामण मोरे (वय ४४, रा.सोनगीर, ता.जि.धुळे), जयप्रकाश राजाराम यादव (वय ३८, हल्ली रा.सोनगीर, ता. जि.धुळे मुळ रा.दिनदासपूर, पो.ओडार, ता.पिंडरा, जि.वाराणसी, उत्तर प्रदेश), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांची हा गुन्हा विरेंद्र सिंग रामकेवलसिंग ठाकुर (रा.हाथगवा, ता.पुंडा, जि.प्रतापगड, उत्तर प्रदेश), सोपान पाटील (रा.वणी, ता.जि.धुळे पुर्ण नाव माहित नाही), तसेच चोरी केलेला मुद्देमाल रवींद्र आनंद माळी (वय. ४२, रा.शिरपूर, ता.शिरपूर, जि.धुळे), सुनिल ईश्वर सोनार (वय ३५, रा.बालाजीनगर, शिंगावे, ता.शिरपूर, जि.धुळे), यांना विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे.
अवश्य वाचा : “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक (Local crime branch)
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, शाहीद शेख, गणेश धोत्रे, गणेश लोंढे, अरुण गांगुर्डे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, अशोक लिपणे, विशाल तनपुरे, अमृत आढाव, प्रशांत राठोड, महादेव भांड व भगवान धुळे यांच्या पथकाने केली.