Local Crime Branch : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या पाच गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या पाच गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0

Local Crime Branch : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (Kashti) येथे डांबून ठेवलेल्या पाच गोवंशीय जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात (Shrigonda Police Station) पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सुमारे सात लाख तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सोहम यशवंत टिळे (वय- २१, रा. टिळेवाडी, राहु ता.दौंड जि.पुणे), ओंकार दशरथ सायकर (रा. राहु थोरली विहीर ता.दौंड जि.पुणे), हिम्मत कुरेशी रा.धाराशिव), शोएब ताहेर कुरेशी रा.खडकत ता.आष्टी जि.बीड), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी

खात्रीशीर माहितीनुसार कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यात गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार श्रीगोंदा तालुक्यात काष्टी ते श्रीगोंदा जाणारे रस्त्यावर पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सात लाख तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)

यामध्ये पाच गोवंशीय जनावरांची सुटका करून असा एकूण सात लाख तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अमलदार सुयोग सुपेकर, दीपक घाटकर, पंकज व्यवहारे, प्रकाश मांडगे, रोहित यमुल यांच्या पाथकाने केली आहे.