Local Crime Branch : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची तीन महिन्यात दमदार कामगिरी; ७ कोटी ५८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

0

Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत विविध गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या कालावधीत एकूण १२० गुन्हे उघडकीस आणून २५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ७ कोटी ५८ लाख ९३ हजार ५९८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी (Kiran Kumar Kabadi) यांच्या पथकाने केली आहे.

Local Crime Branch : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची तीन महिन्यात दमदार कामगिरी; ७ कोटी ५८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
Local Crime Branch : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची तीन महिन्यात दमदार कामगिरी; ७ कोटी ५८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

तांदूळ व्यापाऱ्याची सव्वा कोटीची फसवणूक; गुन्हा दाखल

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना अटक

खून, दरोडा, जबरी चोरी, स्नॅचिंग, घरफोडी आणि चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर कारवाई करत पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात सात खुनाचा घटना घडल्या आहेत. त्यापैकी १८ आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. दरोडाच्या नऊ घटना समोर आली असून त्यापैकी २९ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ताब्यात घेतले आहे.

Local Crime Branch : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची तीन महिन्यात दमदार कामगिरी; ७ कोटी ५८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
Local Crime Branch : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची तीन महिन्यात दमदार कामगिरी; ७ कोटी ५८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

चाेरांच्या आवळल्या मुसक्या (Local Crime Branch)

जबरी चोरीच्या ९ गुन्ह्यांत ३७ आरोपींना अटक करून ३८ लाख २८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घरफोडीच्या २१ गुन्ह्यांत २० आरोपींना अटक करून ३८ लाख २५ हजार ५७५ रुपये हस्तगत करण्यात आले, तर चोरीच्या १९ गुन्ह्यांत १८ आरोपींना अटक करत ३१ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Local Crime Branch : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची तीन महिन्यात दमदार कामगिरी; ७ कोटी ५८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
Local Crime Branch : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची तीन महिन्यात दमदार कामगिरी; ७ कोटी ५८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

स्नॅचिंगच्या ८ गुन्ह्यांत ८ आरोपींना अटक करून २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरोडा तयारीच्या ३ गुन्ह्यांत १५ आरोपींना अटक करत ६ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Local Crime Branch : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची तीन महिन्यात दमदार कामगिरी; ७ कोटी ५८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
Local Crime Branch : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची तीन महिन्यात दमदार कामगिरी; ७ कोटी ५८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

याशिवाय, आर्म ॲक्ट अंतर्गत ६ कारवायांमध्ये ५ कट्टे व ११ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अवैध गुटखा, वाळू तस्करी, गोमांस वाहतूक, एनडीपीएस तसेच अवैध गॅस रिफिलिंग यांसारख्या गुन्ह्यांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. अवैध वाळू प्रकरणात सर्वाधिक १ कोटी ७४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.