Local Crime Branch : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एक वर्षात ३० आरोपी हद्दपार

Local Crime Branch : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एक वर्षात ३० आरोपी हद्दपार

0
Local Crime Branch : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एक वर्षात ३० आरोपी हद्दपार
Local Crime Branch : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एक वर्षात ३० आरोपी हद्दपार

Local Crime Branch : नगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर (Illegal Slaughterhouses) मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) एक वर्षात तब्बल ३० आरोपींना हद्दपार केल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. सन २०२५-२६ या कालावधीत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तल व्यवसायावर आळा घालण्यासाठी विशेष पथकाने सातत्याने कारवाया केल्या.

नक्की वाचा : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; सात उमेदवारांत लढत

यांना केले हद्दपार

या कारवाईत नेवासा, एमआयडीसी, राहाता, श्रीरामपूर आणि लोणी या भागांतील टोळ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. नेवासा परिसरातील नदिम सत्तार चौधरी (टोळी प्रमुख) याच्यासह फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलिम खाटीक, खलील उस्मान चौधरी, अबु शहाबुद्दीन चौधरी, मोजि अबू चौधरी, जबी लतिफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी आणि अकिल जाफर चौधरी यांना हद्दपार करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कठोर कारवाईमुळे अवैध कत्तलखान्यांवर आळा (Local Crime Branch)

एमआयडीसी परिसरात वसीम कादीर कुरेशी (टोळी प्रमुख), अदिल अमीन कुरेशी व शफिक नूर कुरेशी यांच्यावर कारवाई झाली. राहाता तालुक्यात नियाज अहमद शेख (टोळी प्रमुख) याच्यासह सद्दाम शेख, जकरीया शब्बीर कुरेशी, वसीम हनिफ कुरेशी, कैफ रऊफ कुरेशी आणि अरबाज अल्ताफ कुरेशी यांना हद्दपार करण्यात आले.

श्रीरामपूर शहरात अहमदनुर अब्दुलगणी कुरेशी (टोळी प्रमुख) व एजाज कादर कुरेशी यांच्यावर कारवाई झाली. तसेच मुनाफ चाँद शेख (टोळी प्रमुख), सलमान अजीज शेख, इकलास मुनाफ शेख आणि लोणी परिसरातील फैजान जब्बार कुरेशी (टोळी प्रमुख), मुन्तजीर मुनिर कुरेशी, अब्दुलकरीम अमिर कुरेशी, मुनिर अमिर कुरेशी, जब्बार हसन कुरेशी, नाजीम आयुब कुरेशी, वसीम आयुब कुरेशी व रिजवान महेबुब कुरेशी यांचा समावेश आहे.

पोलीस प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांवर मोठा आळा बसला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत झाली आहे. पुढील काळातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.