
Local Crime Branch : नगर : जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध १२ गावठी हातभट्टी (Illegal country liquor) अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाई करत छापे टाकले. या कारवाईत एकूण सहा लाख ७६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधितांविरूध्द विविध पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल (Case Registered) करण्यात आले आहेत.

नक्की वाचा : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
१२ ठिकाणी छापे टाकून हातभट्टी अड्डे उध्वस्त
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निरीक्षक कबाडी यांनी आपल्या पथकातील अधिकाऱ्यांसह चार स्वतंत्र पथके तयार करून जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. गुरूवारी (ता.९) व शुक्रवारी (ता.१०) पहाटेच्या सुमारास श्रीगोंदा, श्रीरामपूर शहर, सोनई आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पथकांनी माहितीच्या आधारे १२ ठिकाणी छापे टाकून अवैध गावठी हातभट्टी अड्डे उध्वस्त केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पोलीस ठाणेनिहाय कारवाई (Local Crime Branch)
श्रीरामपूर शहर येथे सर्वाधिक सात गुन्हे दाखल करण्यात आले असून श्रीगोंदा येथे एक, सोनई येथे दोन आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व कारवाईत मिळून सहा लाख ७६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही करवाई पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, अनंत सालगुडे, संदीप मुरकुटे, दीपक मेढे यांच्या पथकाने केली.


