Local Crime Branch : चितळे रस्ता परिसरात दुकाने लुटणारे तिघे आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : चितळे रस्ता परिसरात दुकाने लुटणारे तिघे आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0

Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर शहरातील चितळे रस्त्यावरील दुकाने व हॉटेलमध्ये चोरी (Theft) करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतली आहे.

नक्की वाचा : महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार : मुख्यमंत्री फडणवीस

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे

मेहताब सफियाना शेख (रा. बौद्ध नगर, पुणे), अशफाक दिलशाद शेखे (रा. ज्योतीबानगर, पुणे), निसार अली नजर मोहम्मद (हल्ली रा. वाघेश्वर नगर, वाघोली), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस ‘यलो अलर्ट’

संशयित आरोपी हे पुणे येथील असल्याचे माहिती (Local Crime Branch)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार चितळे रस्ता परिसरात हॉटेल व कपड्याच्या दुकानात चोरी करणारे संशयित आरोपी हे पुणे येथील असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकास सूचना देऊन एक पथक पुणे येथे रवाना केले. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार तीन आरोपींना ताब्यात घेतले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार शाहिद शेख, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे,रोहित येमूल, सागर ससाणे, अमृत आढाव, प्रशांत राठोड, भगवान धुळे, अर्जुन बडे यांच्या पथकाने केली आहे.