Ahmednagar Mahakarandak : ‘लोकल पार्लर’ने पटकाविला ‘अहमदनगर महाकरंडक’

नगर : राज्यातील सर्वात मोठी व मानाची मराठी एकांकिका स्पर्धा असलेली अहमदनगर महाकरंडक (Ahmednagar Mahakarandak) एकांकिका स्पर्धा नुकतीच झाली.

0
Ahmednagar Mahakarandak : 'लोकल पार्लर'ने पटकाविला 'अहमदनगर महाकरंडक'
Ahmednagar Mahakarandak : 'लोकल पार्लर'ने पटकाविला 'अहमदनगर महाकरंडक'

Ahmednagar Mahakarandak | राज्यातील सर्वात मोठी व मानाची मराठी एकांकिका स्पर्धा असलेली अहमदनगर महाकरंडक (Ahmednagar Mahakarandak) एकांकिका स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेत ‘लोकल पार्लर’ने (गुरूनानक खालसा स्वायत्त महाविद्यालयाच्या संघ) महाकरंडक पटकाविला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता साकार देसाई (लोकल पार्लर) व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री निहारिका राजदत्त (उर्मिलायन) ठरली. यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष होते. १८ ते २१ जानेवारी या कालावधीत नगरमधील (Ahmednagar) माऊली सभागृहात ही स्पर्धा झाली.

हे देखील वाचा : भगवं वादळ मुंबईच्या दिशेने रवाना; मनाेज जरांगे पाटलांची उद्या नगरमध्ये दीडशे एकरावर सभा

बक्षीस मिळातच जल्लोष (Ahmednagar Mahakarandak)

अहमदनगर महाकरंडकच्या अंतिम फेरीत राज्यातून आलेल्या २४ एकांकिका सादर झाल्यात. त्यामुळे स्पर्धकांत निकालाची उत्सुकता होती. आज (रविवारी) सकाळी अकरा वाजता बक्षीस वितरण जल्लोषात सुरू झाले. उत्कंठा असलेल्या स्पर्धकांनी बक्षीस मिळातच जल्लोष केला. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष व अहमदनगर महाकरंडकचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया, आमदार संग्राम जगताप,  श्री महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाल शिंगी, झी मराठीचे चिफ चॅनेल ऑफिसर भावेश जानवलेकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे अहमदनगर विभागप्रमुख शशांक साहू, स्वप्नील मुनोत यांच्याबरोबर या स्पर्धेला लाभलेले परीक्षक अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक संजय मोने, अभिनेते अतुल परचुरे, अभिनेत्री कृतिका तुळसकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा दिमाखात झाला.

अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एन्टरटेनमेंट्स आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित व श्री. महावीर प्रतिष्ठान अहमदनगर हे स्पर्धेचे आयोजन होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दर्जेदार एकांकिकेमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. नगरकर रसिकांसह राज्यभरातील नाट्यप्रेमी रसिकांनी या स्पर्धेतील नाटकांचा आनंद घेतला. या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर ‘लेट्सअप’ तर असोसिएशन विथ ‘आय लव्ह नगर’ होते. ‘झी युवा’ या वाहिनीने प्रायोजक म्हणून अहमदनगर महाकरंडक स्पर्धेत आपली भूमिका बजाविली. तर बँक ऑफ महाराष्ट्र हे या स्पर्धेचे बँकिंग पार्टनर होते. 

नक्की वाचा: जिल्हाधिकाऱ्यांचे नगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी; पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या फिल्मचे सादरीकरण (Ahmednagar Mahakarandak)

बक्षीस वितरणानंतर आज (रविवारी) सायंकाळी ४ ते ७ या कालावधीत ‘उत्सवमूर्ती’, ‘कालसर्प’ आणि ‘कुंकुमार्चन’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपटाचे (शॉर्ट फिल्मचे) स्क्रिनिंग विशेष निमंत्रितांसाठी होणार आहे.

सांघिक पारितोषिके

एकांकिका

प्रथम क्रमांक : लोकल पार्लर (गुरुनानक खालसा स्वायत्त महाविद्यालय)

द्वितीय क्रमांक : पाटी (एकदम कडक नाट्यसंस्था, मुंबई)

तृतीय क्रमांक : सिनेमा (मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे)

चतुर्थ क्रमांक : उर्मिलायन (ईलाही थिएटर्स, मुंबई)

उत्तेजनार्थ : पुंडलिका भेटी (एम.डी. महाविद्यालय, मुंबई)

सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका : हॅलो इन्स्पेक्टर (रेवन एन्टरटेन्मेंट, पुणे)

परीक्षक शिफारस एकांकिका : बिन कुछ कहे, बिन कुछ सुने (एल. एल. के.एल.पी. प्रॉडक्शन, पुणे)

वैयक्तिक पारितोषिके

दिग्दर्शन

प्रथम क्रमांक : नचिकेत पवार, साहिल पवार (लोकल पार्लर)

द्वितीय क्रमांक : प्रणय गायकवाड (पाटी)

तृतीय क्रमांक : अभिप्राय कामठे (सिनेमा)

उत्तेजनार्थ : निहारिका राजदत्त (उर्मिलायन)

उत्तेजनार्थ : ऋषिकेश मोहिते, गौरव बहुतले (पुंडलिका भेटी)

अभिनेता

प्रथम क्रमांक : साकार देसाई (लोकल पार्लर)

द्वितीय क्रमांक : औदुंबर बाबर (पाटी)

तृतीय क्रमांक : राहुल पेडणेकर (एकूण पट १)

उत्तेजनार्थ : श्रेयश जोशी (सिनेमा)

उत्तेजनार्थ : साहिल चव्हाण (पुंडलिका भेटी)

अभिनेत्री

प्रथम क्रमांक : निहारिका राजदत्त (उर्मिलायन)

द्वितीय क्रमांक : विजया गुंडप (पाटी)

तृतीय क्रमांक : संचिता जोशी (चाहूल)

उत्तेजनार्थ : मनस्वी लगाडे (एकूण पट १)

उत्तेजनार्थ : सानिका देवळेकर (उणिवांची गोष्ट)

सह-अभिनेता

प्रथम क्रमांक : देवेन कोळंबकर (पुंडलिका भेटी)

सह-अभिनेत्री :

प्रथम क्रमांक : सानिका बडवे (असणं-नसणं)

विनोदी कलाकार :

प्रथम क्रमांक : राघवेंद्र कुलकर्णी (हॅलो इन्स्पेक्टर)

द्वितीय क्रमांक : प्रसाद नाकील (हॅलो इन्स्पेक्टर)

लक्षवेधी अभिनेता : आरव आहीर (ढिमटॅक ढिटंग)

प्रकाश योजना

प्रथम क्रमांक : गौरव जोशी (बिन कुछ कहे, बिन कुछ सुने)

द्वितीय क्रमांक : आकाश/मयूर (जंगीस्तान व्हाया लढजाम)

तृतीय क्रमांक : निखिल मारणे (चाहुल)

संगीत

प्रथम क्रमांक : शुभम ढेकळे (पुंडलिका भेटी)

द्वितीय क्रमांक : अक्षय धांगट (लोकल पार्लर)

तृतीय क्रमांक : जनार्दन धात्रक/राज पादारे (उर्मिलायन)

नेपथ्य :

प्रथम क्रमांक : साहिल पवार (लोकल पार्लर)

द्वितीय क्रमांक : साईशा पेडणेकर/नील प्रभूलकर (जंगिस्तान व्हाया लढजाम)

तृतीय क्रमांक : ओम आर्टस् स्टुडिओ, नाशिक (संगीत रंडकी पुनव)

रंगभूषा :

प्रथम क्रमांक : राज्ञी सोनवणे (जंगिस्तान व्हाया लढजाम)

द्वितीय क्रमांक : ओम आर्टस् स्टुडिओ, नाशिक (संगीत रंडकी पुनव)

वेशभूषा :

प्रथम क्रमांक : ओम आर्टस् स्टुडिओ, नाशिक (संगीत रंडकी पुनव)

द्वितीय क्रमांक : नेहा पाटोळे (पुंडलिका भेटी)

लेखन :

प्रथम क्रमांक : नचिकेत पवार/साहिल पवार (लोकल पार्लर)

द्वितीय क्रमांक : सिद्धेश साळवी (एकूण पट – १)

तृतीय क्रमांक : भावेश आमडसकर (पाटी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here