Lohar Community : लोहार समाजातील ८० गुणवंत, पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार

Lohar Community : लोहार समाजातील ८० गुणवंत, पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार

0
Lohar Community : लोहार समाजातील ८० गुणवंत, पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार
Lohar Community : लोहार समाजातील ८० गुणवंत, पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार

Lohar Community नगर : अखिल महाराष्ट्र गाडीलोहार समाज (Lohar Community) विकास महासंघ, प्रणित, लोहार शिक्षण परिषद, महाराष्ट्र (Maharashtra) राज्यतर्फे समाजातील दहावी (10th), बारावी, स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षेत यशस्वी झालेल्या ८० गुणवंत व समाजातील पदोन्नती मिळालेल्या अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त उद्योजक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. लोहार शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या निबंधलेखन स्पर्धेतील विजेत्यांचाही (Essay Writing Competition) रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

नक्की वाचा : संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप

कार्यक्रमास उपस्थिती

सावेडीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे सचिव प्रा. डॉ. एस. के. पोपळघट हे होते. तर  प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती कावरे, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, मिलिंद हिवलेकर,मुंबई विद्यापीठाच्या प्रा. डॉ. क्षमाली सोनटक्के उपस्थित होते.

अवश्य वाचा : मुंबईनंतर पुणे व सोलापूर मध्ये मान्सूनची एन्ट्री!

शिक्षणाधिकारी बुगे म्हणाले, (Lohar Community)

लोहार शिक्षण परिषद ही विद्यार्थी व पालकांना प्रेरणा देण्याचे काम करत आहे. लोहार समाज हा जिद्द व चिकाटीने व्यवसाय करतो. मातृभाषेची चांगली त्याचे विचार चांगले असतात. शिक्षण हे समाजाचे विकासाचे साधन आहे. आजच्या मोबाईल युगात वाचन महत्त्वाचे आहे वाचनामुळे अनेक चांगली माणसे घडली, असे त्यांनी सांगितले.


अतिरिक्त जिल्हाधिकारी कावरे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठ्या ध्येयपर्यंत पोहोचता येते. आज आपल्या समाजातील मुलेही चांगल्या पदावर कार्यरत आहेत याचा अभिमान आहे. समाज विकासासाठी व शैक्षणिक कार्यासाठी मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली. लोहार समाजाला पुढे जायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेत आपली मुले आहेत. ते यश मिळवत आहेत. लोहार शिक्षण परिषद गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवते आहे .त्यांना उभारणीच्या टप्प्यावर कौतुक होणे ही अभिमानास्पद बाब आहे, असे त्यांनी सांगितले.


तंत्रज्ञान पुढे जात आहे. कोकण, जळगाव, अमरावती या भागात समाज बांधव कार्यरत आहेत. समाजातील सर्व घटनांनी पुढे येऊन समाजाची प्रगती हाच उद्देश ठेवून कार्य केले तर आपण पुढे जाऊ. आपल्या समाजातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी कमी आहेत. स्पर्धा परीक्षा ओबजेटिव्ह होती आता ती सब्जेक्टीवमध्ये आली आहे. मुलांनी अभ्यास करताना वाचन, चिंतन, मनन यांत मग्न रहावे. अभ्यासात सातत्य ठेवा. ध्येय निश्चित ठेवा. स्पर्धा परीक्षा ही खूप कष्ट करून ध्येय साध्य करण्याची गोष्ट आहे. पण ध्येय साध्य करूपर्यंत त्यापासून हटू नका, असे आवाहन  कावरे यांनी केले.  प्रा. हर्षल आगळे यांनी त्यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन केले.

यावेळी जिल्ह्यातील १०वी १२वी बोर्ड परीक्षेतील, स्कॉलरशिप व  इतर परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव  व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. नायब तहसीलदार राजेंद्र लाड, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक प्रकाश लोखंडचूर, फॉरेन्सिक अधिकारी विलास हरेल, महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक आगळे, जीएसटी अधिकारी गुरुप्रसाद लोहार  यांचा पदोन्नती मिळाल्याबद्दल, तर समाज आर्थिक महामंडळासाठी उपोषण करणारे दादासाहेब कळसाईत, यशस्वी उद्योजक गोरख भालके, अमोल जवणे,निवृत्त एस टी कर्मचारी बाबासाहेब लोखंडचूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्तविकात लोहार शिक्षण परिषदेचे उपसचिव  प्रा. हर्षल आगळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका मांडली तसेच प्रमुख पाहुणे यांची ओळख करून दिली. लोहार शिक्षण परिषदेच्या कार्याची माहिती दिली. लोहार शिक्षण परिषदेचे राज्याध्यक्ष प्राचार्य सुभाष कौसे यांनी लोहार शिक्षण परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.डॉ.साहेबराव पोपळघट यांनी महासंघाचे सहकार्य राहील असे जाहीर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ कौसे, दत्तात्रेय पोपळघट, प्रशांत जवणे, रोहिदास सोनवणे, डॉ. मच्छिंद्र गाडेकर, नंदकिशोर आगळे, वसंत थोरात, सुनील थोरात, श्रीहरी आगळे, हर्षल जवणे, सौरभ जवणे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रा. रामदास लाड यांनी सूत्रसंचालन केले. पुढील वर्षासाठी अनेक समाज बांधवांनी स्कॉलरशिप जाहीर केल्या. यात लोहार समाजातील ज्यांचा आयटी कॉलेजमध्ये प्रवेश होईल, नवोदय विद्यालयात प्रवेश होईल, वक्तृत्व स्पर्धेसाठी ही पारितोषिकांची घोषणा करण्यात आली.