Lok Adalat : श्रीगोंदा: येथील जिल्हा व सत्र न्यायालयात (District and Sessions Court) रविवार दि.३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे (Lok Adalat) आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीच्या सुरवातीला नोव्हेंबर २०२३ तसेच जानेवारी २०२४ रोजी दाखल मोटार अपघात (Motor accident) प्रकरण निकाली काढण्यात येऊन तडजोड झालेल्या २३ लाख ७५ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईचा धनादेश (Cheque) वितरित करण्यात येऊन लोक अदालत सुरू करण्यात आली.
हे देखील वाचा: राजस्थान रॉयल्स आयपीएल साठी सज्ज;नवी जर्सी रिलीज
४ हजार ५४ प्रकरणे निकाली (Lok Adalat)
लोक न्यायालयात १४ हजार ७२८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी ४ हजार ५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ३ कोटी ४४ लाख ९१ हजार ७८१ रुपये वसूल करण्यात आले. लोकन्यायालयामध्ये आपली प्रकरणे सामुपचाराणे मिटवून आपला वेळ व पैसा वाचवावा व नुकसान भरपाईची तडजोड झालेली प्रकरणीची रक्कम लोकांना लवकरात लवकर मिळते असा संदेश देण्यात आला. लोकअदालतमध्ये मोटार अपघात , भुसंपादन कौंटुंबिक वाद, दिवाणी व फौजदारी प्रलबिंत प्रकरणे तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, महावितरण, बँक, बी.एस.एन.एल.ची खटला प्रकरणे ठेवण्यात आली होती.
नक्की वाचा: शेतकरी आंदोलन आक्रमक! देशभरात ‘या’ दिवशी रेल रोको आंदोलन
लोक अदालत यशस्वी करण्यासाठी अनेकांचे सहकार्य (Lok Adalat)
सदरील राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश महेश जाधव, जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख, दिवाणी न्यायाधीश जी. एम. साधले, एन. एस. काकडे, सह दिवाणी न्यायाधीश के. ए. काटकर, एन.पी. बाजी, तसेच श्रीगोंदा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ए. बी. रोडे, ॲड. झेड. टी. गायकवाड, ॲड. जे. बी. शिंदे, वकील संघाचे सदस्य, पदाधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी कुकडी प्रकल्प, महावितरण कार्यकारी व उप अभियंता, पोलीस विभाग, बँक अधिकारी, प्रशासकिय अधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.