Lok Adalat : नगर : लोकअदालतीमध्ये (Lok Adalat) नागरिकांनी आपापसातील वाद सामोपचाराने मिटवून वेळ, पैसा आणि मानसिक ताणतणाव वाचवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या (District Legal Services Authority) अध्यक्षा अंजू शेंडे (Anju Shende) याने केले आहे. लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने मिटविल्यास संबंधित पक्षकारास भरलेली न्यायालयीन फी परत मिळते, असे ही त्यांनी म्हटले आहे.
अवश्य वाचा : काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा, तर अनेकांना अद्याप प्रतीक्षा
दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी (ता. १३) रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोकअदालतीत मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे, दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, तसेच बँका आणि वीज वितरण कंपन्यांची दाखलपूर्वीची प्रकरणे यांचा समावेश करण्यात येणार आहे.
नक्की वाचा : काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचणीला सुरुवात; मुलाखतीसाठी अर्ज मागविले
आपापसातील वाद सामोपचाराने मिटविण्याची संधी (Lok Adalat)
याशिवाय कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणे देखील या लोकअदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने मिटविल्यास संबंधित पक्षकारास भरलेली न्यायालयीन फी परत मिळते. नागरिकांनी आपापसातील वाद सामोपचाराने मिटवून वेळ, पैसा आणि मानसिक ताणतणाव वाचवावेत. राष्ट्रीय लोकअदालतीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा शेंडे व सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे.



