Lok Kalyan Mela : नगर : अहिल्यानगर शहरातील फेरीवाले, पथविक्रेत्यांना प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत “लोक कल्याण मेळावा” (Lok Kalyan Mela) आयोजित करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी दिली. केंद्र सरकारच्या (Central Government) गृह निर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शहरातील पथविक्रेते, फेरीवाल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यांनी केले आहे.
अवश्य वाचा : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…
पथविक्रेत्यांचे योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न
केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची पुनरर्चना करून सदर योजनेला मुदतवाढ दिली. या १६ दिवसांच्या कालावधीत “लोक कल्याण मेळावा” आयोजित करण्यात येणार आहे. पीएमस्वनिधी योजनेअंतर्गत नवीन अर्जासाठी प्रचार प्रसिद्धी करणे, आधीच मंजूर झालेल्या अर्जाचे कर्ज वितरण सुलभ करणे, बँकेकडून परत केलेले प्रलंबित अर्ज निकाली काढणे, बँकांकडे मंजुरीसाठी प्रलंबित अर्ज निकाली काढणे, प्रलंबित लाभार्थ्याचे डिजिटल ऑनबोर्डिंग सुनिश्चित करणे, अन्न पदार्थ पथविक्रेत्यांचे प्रशिक्षण आयोजित करणे, पथविक्रेत्यांचे सामाजिक-आर्थिक प्रोफाइलिंग करून त्यांना योजनांचा लाभ मिळून देणे या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नक्की वाचा: ‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करावी; आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया
नवीन नोंदणी व सुविधा उपलब्ध करुन देणार (Lok Kalyan Mela)
अहिल्यानगर शहरात सुमारे १० हजार पथविक्रेते, फेरीवाल्यांची नोंद आहे. या योजनेतून पहिल्या टप्प्यात १० हजार, दुसऱ्या टप्प्यात २० हजार व तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जात होते. शहरात साडेसात हजार प्रस्ताव करण्यात आले आहेत. या योजनेची जनजागृती, नवीन नोंदणी व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.