Lok Sabha : नगर : अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी शिर्डी लाेकसभा (Lok Sabha) मतदारसंघातून महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार भाऊसाहेब वाकचाैरे (Bhausaheb Wakchaure) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), आमदार शंकरराव गडाख, लहू कानडे, संदीप वर्पे आदी दिग्गज उपस्थित हाेते. आजच्या दिवशी १९ व्यक्तींनी ३५ अर्ज, तर, नगर लाेकसभा (Lok Sabha) मतदारसंघात २० जणांनी ४३ अर्ज नेले असून एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही.
हे देखील वाचा: नीलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार
२५ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत (Lok Sabha)
लाेकसभेसाठी अर्ज दाखल हाेण्यास सुरूवात झाल्याने प्रचाराला वेग आला आहे. अर्ज दाखल करण्यास १८ एप्रिलपासून सुरूवात झाली असून २५ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. नगर, शिर्डी लाेकसभेसाठी १३ मे राेजी मतदान हाेणार आहे. तर ४ जून राेजी मतमाेजणी हाेणार आहे.
नक्की वाचा: माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट, तुमच्याकडे काय?; सुजय विखेंचा विरोधकांवर घणाघात
उमेदवारांकडून मतदारसंघात शक्तीप्रदर्शन (Lok Sabha)
दाेन्ही मतदारसंघात उमेदवारांकडून आराेप प्रत्याराेपांच्या फैरी झडत आहे. उमेदवारांकडून मतदारसंघात शक्तीप्रदर्शन, जंगी सभा घेतल्या जात आहे. आज महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचाैरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.