Lok Sabha : नगर : गंभीर गुन्हेगारी आरोपांमध्ये अटक झाल्यास किंवा ताब्यात घेतल्यास पंतप्रधानांपासून (Prime minister) ते राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि जम्मू आणि काश्मीरसह (Jammu and Kashmir) केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना पदच्युत करण्याची तरतूद असणारे विधेयक आज लोकसभेत (Lok Sabha) मांडण्यात आले.
नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर
तीन दुरुस्ती विधेयक सादर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत तीन महत्त्वाची विधेयके मांडली. केंद्र सरकार संविधानात आता मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आज सादर झालेल्या विधेयकांमध्ये गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये 30 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी अटक झाल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. विरोधक इंडिया आघाडीने बुधवारी भाजपाप्रणीत एनडीए सरकारवर तीन दुरुस्ती विधेयकांवरून गंभीर आरोप केले आहेत.
अवश्य वाचा : संग्राम भंडारे महाराजांना संरक्षण द्या; भाजपच्या तिनही जिल्हाध्यक्षांची मागणी
काँग्रेसने आरोप केला की, (Lok Sabha)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, २०२५, केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक, २०२५, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२५ सादर केले. काँग्रेसने आरोप केला की, ही विधेयके लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आणि नरेंद्र मोदी सरकारवर केलेल्या मतचोरीच्या आरोपांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा एक प्रयत्न आहे. इतर विरोधी पक्षांनीही या प्रस्तावित कायद्याला लोकशाही व्यवस्थेवरील उघड हल्ला असल्याचे म्हटले आहे.
शाह यांनी विधेयक सादर करताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या दरम्यान काही खासदारांनी विधेयकांच्या प्रती फाडून अमित शाह यांच्या दिशेने फेकल्या. विरोधकांच्या या प्रकारामुळे लोकसभेत प्रचंड गोंधळ उडाला. सत्ताधारी पक्षांच्या खासदारांनीही विरोधकांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली.
तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सर्वात आधी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी विधेयक सादर होताच घोषणा देण्यास सुरुवात केली. काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी आपल्या जागेवर उभे राहून विधेयकाची प्रत फाडून फेकून दिली. नंतर काँग्रेसचे खासदार मोकळ्या जागेत आले. समाजवादी पार्टीचे खासदारांनीही विधेयकाच्या प्रती फाडल्या. या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.