Lok Sabha Elections : नगर : देशात लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) राजकीय वातावरण तापू लागले आहे. राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांना निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची म्हणजेच आचार संहिता (code of conduct) लागण्याची प्रतीक्षा आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) उद्या (ता. १६) पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात लोकसभेसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा: गांजाची वाहतूक करणारे तिघे जेरबंद
लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत निर्णय
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज सकाळी बैठक झाली. ही बैठक ४० मिनिटे चालली. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्त सहभागी झाले होते. त्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात आल्याचे समजते. लोकसभेच्या निवडणुका सात ते आठ टप्प्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून उद्या (शनिवारी) पत्रकार परिषदेत करण्यात येणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकांसोबत ओडिशा, सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा : नगरच्या विकासासाठी अजित पवारांनी संग्राम जगतापांना दिले ९४ कोटीचे बंपर गिफ्ट
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections)
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुका सात टप्प्यात झाल्या. त्यावेळी वेळी निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी तारखा जाहीर केल्या होत्या. पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान झाले. २३ मे रोजी निकाल लागला. त्या निवडणुकीच्या वेळी देशात ९१ कोटीहून अधिक मतदार होते, त्यापैकी ६७ टक्के मतदारांनी मतदान केले होते.