Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या काळातच 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

Farmer suicides

0
Farmer suicides
Farmer suicides

Lok Sabha Elections : नगर :महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) वातावरण आहे. पण याच दरम्यान, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या 61 दिवसांत तब्बल 66 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. तर जानेवारी ते एप्रिल या चार महिण्यात 188 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. जगाचा पोशिंदा बळीराजा आर्थिक मानसिक कोंडीत असताना शासन, प्रशासन आणि राजकारण्यांचं (Politician) मात्र दुर्लक्ष होत आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, सावकारांसह बँकांचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलांची लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्या (Farmer suicides) करीत आहेत. विशेष म्हणजे एकट्या अमरावती जिल्ह्यात मार्च महिन्यात तब्बल 40 शेतकरी आत्महत्या झाल्या आहे.

हे देखील वाचा: ‘सगेसोयरेसाठी’ ४ जूनपासून पुन्हा आंदोलन; मनोज जरांगेंनी उपसलं उपोषणाचं हत्यार

निवडणुकीमुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष (Lok Sabha Elections)

जिल्हाप्रशासन निवडणकीच्या तयारीत व पदाधिकारी राजकारणात व्यस्त असल्याने जगाचा पोशिंदा निवडणूक काळात दुर्लक्षित राहिला आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत असताना 2001 पासून 2024 पर्यंत तब्बल 5294 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड झालंय.

Farmer suicides
Farmer suicides

नक्की वाचा : मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवाराच्या स्लिप; मविआच्या उमेदवाराकडून संपात व्यक्त

वादळी वाऱ्याचा फटका (Lok Sabha Elections)

एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना दुसरीकडे वादळी वाऱ्यासह अवकाळ पावसाने पु्न्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह आवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पाईट परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने पॉलिहाऊसची तीन शेड उद्धवस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान झालं. शेतात काबाड कष्ट करुन बँकेच्या कर्जावर उभारलेले पॉलिहाऊस डोळ्यासमोर उद्धवस्त झाल्याने शेतकरी हतबल झालाय. सरकारने तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसराला अवकाळी पावसाने झोडल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालंय. राजेंद्र घाडगे या शेतकऱ्याची तीन एकर केळीची बाग वादळी वाऱ्याच्या पावसाने जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालंय. डाळिंब, ऊस, कांदा यांसारख्या पिकांनाही अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला असून शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here