Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शब्द दिला, त्यांनी आता शब्द पाळावा : डॉ. पठारे

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शब्द दिला, त्यांनी आता शब्द पाळावा : डॉ. पठारे

0
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शब्द दिला, त्यांनी आता शब्द पाळावा : डॉ. पठारे
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शब्द दिला, त्यांनी आता शब्द पाळावा : डॉ. पठारे

Lok Sabha Elections : पारनेर : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) निलेश लंके यांना निवडून आणा, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पारनेर मतदारसंघाची जागा ही ठाकरे गटाला सोडली जाईल, असा शब्द दिला होता. असे म्हणत पारनेरमध्ये ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे (Dr Shrikant Pathare) यांनी विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) रणशिंग फुंकले.

नक्की वाचा: ‘कर्जमुक्ती योजने’साठी आधारची केवायसी गरजेची : शिवाजी कर्डिले

खासदार संजय राऊत यांनी दिला होता शब्द

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना निवडून आणा, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पारनेर मतदारसंघाची जागा ही ठाकरे गटाला सोडण्यात येईल, असा शब्द आम्हाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. यामुळे दिलेला शब्द पाळला जाईल, अशी अपेक्षा डाॅ. पठारे यांनी व्यक्त केली. ठाकरे गटाच्या वतीने पारनेरमध्ये महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, यावेळी पठारे बोलत होते. मेळाव्याला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या.

अवश्य वाचा: विकासाचा झंझावात सुरू : संग्राम जगताप

यावेळी पठारे म्हणाले, (Lok Sabha Elections)

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर काही गद्दारांनी शिवसेनेचा घात करत वेगळीच चूल मांडली. मात्र, त्या काळातही आम्ही ठाकरे यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिलो. पारनेर तालुक्यातील शिवसेना अभेद्य आहे. निलेश लंके यांच्या विजयामध्ये शिवसेनेच्या वाघांचा महत्त्वाचा वाटा राहिला. लोकसभेमध्ये आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला. ठाकरे यांच्या आदेशानुसारच आम्ही लंके यांच्या पाठीशी उभे राहिलो व त्यांना पारनेर मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळवून दिले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेला आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांनाच विराजमान करायचे, असा आम्ही निर्धार केला आहे. उद्धव ठाकरे राजकारणी नाही तर समाजकारणी आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवा यासाठी आपण सर्व सज्ज रहा, असं यावेळी बोलताना डॉ. पठारे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here