Lok Sabha Elections : नगर : पारनेरचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी काल (गुरुवारी) शरद पवार (Sharad Pawar) गटाचे चिन्ह तुतारी हाती घेतली. त्यानंतर ते लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढविणार का यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या संदर्भात त्यांना आज पारनेर येथे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ‘मी लोकसभा निवडणूक लढवावी, ही जनमाणसाची भावना आहे’ असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा :लोकसभा निवडणुकीची उद्या आचार संहिता जाहीर होणार
आमदार लंके म्हणाले (Lok Sabha Elections)
राजकारणात वेगवेगळे मतप्रवाह असतात. आपण त्यातून मार्ग काढायचा असतो. मी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्ते व जनमाणसाची भावना आहे. शरद पवार गट व आमची विचारधारा एकच आहे. दोन्ही गट एकाच विचारधारेवर काम करणारे असल्यामुळे पक्ष प्रवेशाचा संबंध येत नाही. अजित दादा आमचे नेते आहेत. त्यांनी माझ्या हिताचाच विचार नेहमी केला आहे. त्यांची भूमिका वेगळी असू शकते. माझे राजकीय नुकसान होईल, राजकीय कारकीर्दीला धक्का लागेल, असा विचार अजित दादा करणार नाहीत. तुम्ही त्यांचे बाह्यरुप पाहिले आहे. मी मात्र, त्यांचे आंतरमन ओळखून आहे.
नक्की वाचा: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक (Lok Sabha Elections)
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूक लढविणे हा मोठा विषय आहे. कारण, सहा विधानसभा मतदार संघ मिळून एक लोकसभा मतदार संघ तयार होतो. त्यामुळे ही निवडणूक लढविण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक वाटते. आपण सर्वसामान्य कुटुंबातून येऊन समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करत असतो. प्रस्थापित लोकांना तो प्रश्न येत नाही. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात यंत्रणा असते. माझ्या सारख्या कार्यकर्त्यांकडे यंत्रणाच नाही. मला जीवाभावाच्या लोकांना बरोबर घेऊन काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्याशी बोलूनच निर्णय घ्यावा लागेल. मी सर्वांचे ऐकून निर्णय घेतो त्यामुळे माझे निर्णय चुकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.