Lok Sabha Elections : नगर : लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) जाहीर केल्या असून देशात १९ एप्रिल ते १ जून दरम्यान ७ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. आजपासून देशात आचारसंहिता लागू झाली असून नगर जिल्ह्यात १३ मे रोजी मतदान पार पडेल तर ४ जूनला मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) राजीव कुमार आणि सुखबीर सिंह यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. यावेळी निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमारही उपस्थित होते.
हे देखील वाचा : आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पंतप्रधानांचे देशवासियांना खुलं पत्र
लाेकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयाेग सज्ज (Lok Sabha Elections)
दिल्लीत आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलताना म्हणाले, ” आगामी लाेकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयाेग सज्ज झाले आहे. देशात ९७ काेटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. दीड काेटी कर्मचारी निवडणुकीसाठी सज्ज आहे. देशभरात साडेदहा लाख पाेलिंग बूथ आहे. १.८२ काेटी नवीन मतदार मतदान करणार आहे. ५५ लाखांपेक्षा अधिक ईव्हीएम तयार आहे. ८२ लाख प्राैढ मतदार आहे. ४८ लाख तृतीयपंथी मतदार आहे. ४९.७ काेटी पुरुष, तर ४७.१ काेटी महिला मतदार मतदान करणार आहे. तरुण फक्त मतदान करणार नाही, तर अॅम्बेसेडरही बनणार आहे. प्रत्येक बुथवर पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहाची साेय असणार आहे. उन्हापासून संरक्षण हाेण्यासाठी छताची व्यवस्था असणार आहे. पाेलिंग बूथवर न येऊ शकणाऱ्या ८५ वर्षांवरील व्यक्तीला घरी जाऊन मतदान करून घेणार आहे. ८५ लाख नवीन महिला मतदार मतदान करणार आहे. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदानाबाबत काेणाला काही माहिती हवी असल्यास वेबसाइडवर देण्यात येणार आहे. उमेदवाराची प्रत्येक माहिती वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी! राज्यातील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड अनिवार्य
महाराष्ट्रासह देशात २६ ठिकाणी पाेटनिवडणुका (Lok Sabha Elections)
मतदाराला तक्रारी असल्यास सी व्हीजल ॲपवर तक्रारी नाेंदवता येणारआहे. निवडणुकीत हिंसेला अजिबात थारा दिला जाणार नाही. मसल पाॅवर राेखण्यासाठी सुरक्षा यंत्रणासाेबत काम करणार आहे. मसल पाॅवर, मनी पाॅवर राेखण्याचं आव्हान असणार आहे. दाेन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्यात येणार आहे. हिंसामुक्त निवडणुका राबवणं आमची जबाबदारी आहे. पैशांचा गैरवापर हाेऊ देणार नाही. दारु, साड्या, पैसे वाटणाऱ्यांवर विशेष लक्ष राहणार आहे. निवडणुकीत काेणत्याही गैरव्यवहाराला स्थान नाही. प्रचारदरम्यान वैयक्तिक टीका करू नये. साेशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्यात येईल. प्रचारा दरम्यान नियमांचं उल्लंघन करू नये. प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये. द्वेष निर्माण हाेईल, असे भाषण करू नये. महाराष्ट्रासह देशात २६ ठिकाणी पाेटनिवडणुका हाेणार आहे. सिक्कीम, आंध्रप्रदेश, ओडिसा, अरुणाचलप्रदेश या चार राज्यात विधानसभा निवडणुका हाेणार आहे. सात टप्प्यात निवडणुका हाेणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुका १९ एप्रिलला हाेणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला मतदान, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे राेजी हाेणार आहे. चाैथा टप्प्यातील मतदान १३ मे राेजी हाेणार आहे. पाचवा टप्प्यातील मतदान २० मे राेजी हाेणार आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे राेजी, सातव्या टप्प्यातील मतदान १ जून राेजी मतदान हाेणार आहे. मतमाेजणी ४ जूनला हाेणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान हाेणार आहे.
नगर जिल्ह्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटीच तारीख २५ एप्रिल राहणार आहे. २६ एप्रिलला अर्जाची छाननी हाेणार, तर २९ एप्रिलला उमेदवारी अर्ज घेण्याची अंतिम तारीख राहणार आहे. १३ मे राेजी मतदान, तर ४ जूनला मतमाेजणी हाेणार आहे.