Lok Sabha Elections : नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार 

Lok Sabha Elections : नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार

0
Lok Sabha Elections
Lok Sabha Elections : नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार

Lok Sabha Elections : नगर : लाेकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) बिगुल वाजला आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्यांच्या उमेदवारीवरून गदाराेळ सुरू हाेता. त्याच उमेदवारांनी आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सपशेल निवडणुकीतून (Election) माघार घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi)  दिलासा मिळाला असून नगर लाेकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत हाेणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

हे देखील वाचा: आरक्षणाच्या विरोधकांना पूर्ण ताकदीने पाडा; मनोज जरांगे पाटलांचे मराठ्यांना आवाहन

एमआयएमच्या उमेदवाराचीही माघार

लाेकसभा निवडणुकीतून एमआयएमचे उमेदवार डॉ. परवेज अशरफी यांच्यासोबतच ज्यांच्या उमेदवारीरून गदारोळ झाला ते अपक्ष उमेदवार नीलेश साहेबराव लंके (कामोठे, नवी मुंबई) यांनीही अर्ज मागे घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी येत्या १३ मे रोजी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Lok Sabha Elections
Lok Sabha Elections : नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार

नक्की वाचा: ‘देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात तो सत्तेचा गैरवापर’-रोहित पवार

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावे
सुजय राधाकृष्ण विखे (भारतीय जनता पार्टी)
नीलेश ज्ञानदेव लंके (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)
उमाशंकर श्यामबाबू यादव (बहुजन समाज पार्टी)
आरती किशोरकुमार हालदार (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)
कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना(पक्ष))
डॉ. कैलास निवृत्ती जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी)
रवींद्र लिलाचंद कोठारी (राष्ट्रीय जनमंच)
दत्तात्रय आप्पा वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी)
दिलीप कोंडीबा खेडकर (वंचित बहुजन आघाडी)
भागवत धोंडिबा गायकवाड (समता पार्टी)
मदन कानिफनाथ सोनावणे (राईट टु रिकॉल पार्टी)
रावसाहेब शंकर काळे (बहुजन मुक्ती पार्टी)
भाऊसाहेब बापूराव वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी)
शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी)
अमोल विलास पाचुंदकर (अपक्ष)
मच्छिन्द्र राधाकिशन गावडे (अपक्ष)
गोरख दशरथ आळेकर (अपक्ष)
गंगाधर हरिभाऊ कोळेकर (अपक्ष)
नवशाद मुन्सीलाल शेख (अपक्ष)
प्रवीण सुभाष दळवी (अपक्ष)
बिलाल गफूर शेख (अपक्ष)
महेंद्र दादासाहेब शिंदे (अपक्ष)
ॲड. मोहम्मद जमीर शेख (अपक्ष)
अनिल गणपत शेकटकर (अपक्ष)
सूर्यभान दत्तात्रय लांबे (अपक्ष)

अपक्ष उमेदवार नीलेश साहेबराव लंके यांचाही अर्ज मागे (Lok Sabha Elections)

नगर लाेकसभेला महायुतीकडून सुजय विखे यांनी, तर महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. दुरंगी असलेल्या या लढतीमध्ये एमआयएम, तसेच नावात साधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवारांनी देखील उडी मारली होती. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर एमआयएमचे अशरफी यांना मुस्लिम संघटनांकडूनच मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली हाेती. अशरफी यांनी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात जात आपला अर्ज मागे घेतला आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार नीलेश साहेबराव लंके यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Lok Sabha Elections
Lok Sabha Elections : अबब! नगर लाेकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकाच नावाचे दाेन उमेदवार

यांनी माघारी घेतले अर्ज
परवेज उमर शेख (एमआयएम)
गिरीश तुकाराम जाधव (अपक्ष)
डॉ. योगिता प्रवीण चोळके (अपक्ष)
जहीर युसूफ जकाते (अपक्ष)
राणी नीलेश लंके (अपक्ष)
सुदर्शन लक्ष्मण शितोळे (हिंदू एकता आंदोलन पार्टी)
मनोरमा दिलीप खेडकर (अपक्ष)
प्रतीक अरविंद बारसे (अपक्ष)
प्रा. सुनीलराव मोहनराव पाखरे (अपक्ष)
नीलेश साहेबराव लंके (अपक्ष)
मुक्ता प्रदीप साळुंके (इन्सानियत पार्टी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here