Upsc Exam Postponed:लोकसभेमुळे UPSC परीक्षा पुढे ढकलल्या;नवीन तारीख जाहीर 

यूपीएससी CSE च्या प्राथमिक परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. कट-ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी  मुख्य परीक्षा २०२४ साठी नोंदणी करण्यास पात्र ठरतील.

0
Upsc Exam Postponed
Upsc Exam Postponed

नगर : युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकसभा केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने युपीएससी CSE २०२४ प्रिलिम्स परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा २६ मे रोजी होणार होती. लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तारीख आणि UPSC CSE २०२४ प्रिलिम्स परीक्षेची तारीख सारखीच आली होती. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.

नक्की वाचा : बापरे!उत्तर प्रदेशमध्ये दोन चिमुकल्यांची गळा चिरून हत्या

कधी होणार परीक्षा ? (Upsc Exam Postponed)

युपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आयोगाने नवीन तारीख ही जाहीर केली आहे. ही प्रिलिम्स परीक्षा आता १६ जून २०२४ रोजी घेतली जाईल. तर मुख्य परीक्षा २० सप्टेंबर ते ०५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत घेतली जाईल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च २०२४ होती. तर अर्जातील दुरुस्तीसाठी ७ मार्च ते १३ मार्च २०२४ ही मुदत देण्यात आली होती.  युपीएससी  पूर्व परीक्षेसाठी एकूण ८० केंद्रे असतील. तर मुख्य परीक्षा एकूण २४ केंद्रांवर घेतली जाणार आहे.

हेही पहा : माझा वाकचौरेंच्या वृत्तीला विरोध – उत्कर्षा रुपवते

UPSC च्या होणाऱ्या परिक्षा स्थगित (Upsc Exam Postponed)

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर केल्या. लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या दरम्यान सात टप्प्यात होत आहे. तर निकाल  ४ जूनला जाहीर होतील. त्यामुळे या दरम्यान UPSC च्या होणाऱ्या परिक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

तीन टप्प्यावर आधारित असेल परीक्षा  (Upsc Exam Postponed)

यूपीएससीने CSE परीक्षेसाठी एकूण १,०५६ जागा आणि भारतीय वन सेवेसाठी १५० रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेसाठी पात्र अर्जदारांचे मूल्यमापन प्राथमिक, मुख्य आणि व्यक्तिमत्व चाचणी या तीन टप्प्यांवर आधारित असेल. यूपीएससी CSE च्या प्राथमिक परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. कट-ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी  मुख्य परीक्षा २०२४ साठी नोंदणी करण्यास पात्र ठरतील. अधिक माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी UPSC ची वेबसाइट पाहू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here