नक्की वाचा: विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर!
Lok Sabha Result : नगर : लाेकसभा निवडणुकीत (Lok Sabha Result) राज्यामध्ये कुठल्या समाजाचे किती खासदार (MP) निवडून आले, याची आकडेवारी बघितली असता, ४८ पैकी २६ जागांवर मराठा (Maratha) उमेदवार विजयी झालेले आहेत. तर ९ ओबीसी (OBC) खासदार, ६ अनुसूचित जातींचे खासदार आणि ४ अनुसूचित जमातींचे खासदार निवडून आलेले आहेत.
नक्की वाचा: विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर!
मराठा आरक्षणामुळे पराभव
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एनडीएला १७, तर इंडिया आघाडीला ३० जागांवर यश मिळालं आहे. यामध्ये भाजपला मोठं अपयश आल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरी ब्राह्मण, पियूष गोएल अग्रवाल आणि अनिल देसाई सारस्वत ब्राह्मण, असे खासदार निवडून आलेले आहेत. यावेळी राज्यात अनेक फॅक्टर चालल्यामुळे पराभव झाल्याचं मान्य करुन मराठा आरक्षणामुळे पराभव झाल्याचे फडणवीस यांनी एक प्रकारे कबुली दिली. राज्यात भाजपला ९ जागांवर यश मिळालं, तर शिवसेनेला ७ आणि राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर यश मिळालं. तर दुसरीकडे काँग्रेसने १३, उद्धव ठाकरे गटाने ९, तर शरद पवार गटाने ८ जागांवर यश मिळवलं आहे. सांगलीची एक अपक्ष जागा निवडून आलेली आहे.
हे देखील वाचा: साताऱ्यात शरद पवार गटाला ‘पिपाणी’चा फटका
अशी आहे खासदारांची यादी (Lok Sabha Result)
मराठा खासदार
उदयनराजे भोसले, शाहू छत्रपती, डॉ. शोभा बच्छाव, नारायण राणे, श्रीकांत शिंदे, स्मिता वाघ, नरेश म्हस्के, विशाल पाटील, सुप्रिया सुळे, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, धैर्यशील मोहिते, अरविंद सावंत, धैर्यशील माने, संजय देशमुख, प्रतापराव जाधव, राजाभाऊ वाजे, नीलेश लंके, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संदीपान भुमरे, वसंत चव्हाण, नागेश आष्टीकर, संजय जाधव, बजरंग सोनवणे, अनुप धोत्रे, डॉ. कल्याण काळे.
ओबीसी खासदार
डॉ. अमोल कोल्हे, प्रतिभा धानोरकर, सुनील तटकरे, रवींद्र वायकर, रक्षा खडसे, डॉ. प्रशांत पडोळे, संजय दिना पाटील, सुरेश म्हात्रे, अमर काळे.
अनुसूचित जमातींचे खासदार
डॉ. हेमंत सावरा, भास्कर भगरे, गोवाल पाडवी, डॉ. नामदेव किरसान
अनुसूचित जातींचे खासदार
डॉ. शिवाजी काळगे, भाऊसाहेब वाकचौरे, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, श्यामकुमार बर्वे, बळवंत वानखेडे.