Loksabha Election:राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; अमोल कोल्हेंसह ४० दिग्गजांचा समावेश

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील लोकसभेची जोरदार तयारी सुरू केलीय. आज (ता.२)शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली

0
Loksabha Election
Loksabha Election

नगर : महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सर्वच पक्ष अगदी जोमाने प्रचाराची तयारी करत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने (Rashtrvadi Sharad Pawar Party) देखील लोकसभेची जोरदार तयारी सुरू केलीय. आज (ता.२)शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांच्या स्टार प्रचारकांची (Star Pracharak List) यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ४० प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.

नक्की वाचा : राजस्थानचा सलग तिसरा विजय;मुंबईचा घरच्या मैदानावर नमवले

शरद पवार, अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असणार (Loksabha Election)

आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभेच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. या यादीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, सोनिया दुहान, पूजा मोरे यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश आहे.

शरद पवार गटाकडून पाच उमेदवार जाहीर (Loksabha Election)

राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांचे पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामती मधून सुप्रिया सुळे, शिरूर मधून अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here